अहमदनगर : समाजवादी पार्टीच्या अहमदनगरच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी अजीम राजे यांची मुंबई येथे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांच्या हस्ते पत्र देऊन फेरनिवड करण्यात आली. यावेळी फिरोज पठान, पटेल सहाब, मतीन भाई, कुद्दुस तांबटकर, अल्तमश शेख उपस्थित होते. पक्ष बळकटीकरणासाठी व मजबुतीकरणासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अजीम राजे यांची निवड करण्यात आली. राजे हे महासचिव जुल्फिकार आजमी यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व करत आहेत. राजे यांनी जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे अनेक शाखा उद्घाटन करून युवकांची फळी निर्माण करून समाजवादी पार्टी मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आहे.
.................
०१ अजीम राजे