शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर

By admin | Updated: January 15, 2016 23:29 IST

अहमदनगर : बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे जिल्ह्यात पेव फुटले आहे़ त्यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे़

अहमदनगर : बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे जिल्ह्यात पेव फुटले आहे़ त्यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे़ मात्र, पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही़ वारंवार सूचना देऊन यंत्रणा जागची हलत नसल्याने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी उपप्रादेशिक कार्यालयावर ताशेरे ओढले असून, या विभागाला खरमरीत स्मरणपत्रच दिले आहे़ वाहनांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे उपप्रादेशिक कार्यालयाचे धाबे दणाणले आहे़ जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाभर चेकनाके स्थापन करण्यात आले आहेत़ जिल्हाधिकारी कवडे यांनी बैठक घेऊन नाक्यांवर पोलिसांची नियुक्ती करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते़ वाळू माफियांची नाकाबंदी करणे, हा या मागील उद्देश होता़ मात्र, पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा उद्देश धुळीस मिळाला आहे़ चेकनाक्यांवर हजर राहण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही, ही बाब जिल्हाधिकारी कवडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाला सूचनाही केल्या़ पण, त्याची दखल या विभागाने घेतली नाही़ परिणामी वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे़ ही बाब तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली़ त्याची दखल घेऊन कवडे यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतांश वाहनांवर क्रमांक नसतो़ वाहनांवर एम एच १६ असा उल्लेख असतो़ परंतु उर्वरित क्रमांक पुसलेला असतो़ काही वाहनांवर तर खडूने क्रमांक टाकल्याची बाब कारवाईनंतर समोर आली आहे, अशा विनाक्रमांक वाहनांवर कारवाई करायची कुणी, असा प्रश्न आहे़ उपप्रादेशिक कार्यालयाकडून याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते़ महसूल विभागाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ नदीपात्रातून सर्रास वाळूचा उपसा सुरू आहे़ तलाठी एकटा काय करणार, असे सांगून महसूल यंत्रणाही यावर एकप्रकारे पांघरुणच घालत आहे़ महसूल व पोलीस यंत्रणांनी एकत्रित कारवाईची मोहीम राबविल्यासच वाळू वाहतूक रोखणे शक्य होईल, असे अधिकारी खासगीत बोलताना सांगतात़ महसूल विभागाने पकडलेल्या वाहनांवर उपप्रादेशिक कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली जात नाही़ कारवाई केली तरी दंडाची रक्कम अत्यल्प असल्याचे समजते़बेकायदा वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी एकत्रित कोम्बिंग आॅपरेशन हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मत आहे़(प्रतिनिधी)