सुपा : कोरोनापासून बचाव करण्यासाठी महिला बचत गटातील सदस्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचा उपक्रम पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील गोरेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिकदृष्ट्या स्तर उंचावण्यासाठी गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास दाेन हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून वित्त पुरवठा केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमंद यांनी दिली. या महिला बचत गटाच्या सदस्यांमध्ये कोरोनाबाबतीत जनजागृती करून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी सहायक निबंधक कार्यालय प्रतिनिधी भाऊसाहेब उमाप, शाखाधिकारी बाबासाहेब तांबे, बचत गट प्रतिनिधी, सदस्य, विभागीय अधिकारी जयराम तांबे उपस्थित होते.
----
१८ गोरेगाव
गोरेगाव येथील गोरेश्वर फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटांना सॅनिटायझर व मास्क वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद व इतर.