अहमदनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्यावतीने केडगावच्या ओंकारनगर येथील महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शूज व बालमित्र या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, सचिव हेमंत लोहगावकर, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, रोटरी मिडटाऊनचे माजी अध्यक्ष क्षीतिज झावरे, लिटरसीचे संचालक किशोर डोंगरे, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
झंवर म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य आहे. सर्व घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी रोटरी इंटिग्रिटी योगदान देत आहे. क्लबच्या माध्यमातून अनेक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. मुन्शी यांनी महापालिकेची शाळा असूनदेखील शाळेची स्वच्छता व टापटीपपणामुळे शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळणे ही भूषणावह बाब असल्याचे सांगितले.
---------
फोटो - ११ रोटरी पुस्तक वाटप
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्यावतीने केडगावच्या ओंकारनगर येथील महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शूज व बालमित्र या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.