शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गट सचिवांच्या असहकाराने ८४ सेवा संस्थांचा कारभार ठप्प

By admin | Updated: July 2, 2017 17:33 IST

पाथर्डी तालुक्यातील सुमारे ४५ गटसचिवांचा असहकार सध्या सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील ८४ सेवा संस्थांचा कारभार सध्या ठप्प झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव : पाच दिवसांपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी संपामुळे पाथर्डी तालुक्यातील सुमारे ४५ गटसचिवांचा असहकार सध्या सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील ८४ सेवा संस्थांचा कारभार सध्या ठप्प झाला आहे.शासन कर्जमाफीसंदर्भात सेवा संस्था स्थरावर माहिती मागविली आहे. जूनअखेर आर्थिक वर्ष असल्याने वसुली, नवे कर्ज असे महत्त्वाचे कार्यालयीन कामकाज या असहकार आंदोलनाने थंडावले आहेत. याबाबत गटसचिवांचे राज्यस्तरीय संघटनांच्या वतीने बारा जूनला लेखी निवेदन सहकार आयुक्तांना दिले होते. २७ जून अखेरचा अल्टिमेटम देत प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, असे माहिती घेता समजले. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना फलश्रुती या गटसचिवांच्या असहकाराच्या भूमिकेने अधिकच लांबणीवर जात आहे.पाथर्डी तालुका दुष्काळी असूनही जिल्हा बँक स्थरावर वसुलीबाबत जिल्ह्यात अग्रणी आहे. त्यामुळे ब-याच संस्थेत थकबाकीदार संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. सरसकट दीड लाख कर्जमाफी धोरण तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारे ठरत आहे. कर्जमाफीच्या वादळी चर्चेत गटसचिव असहकार आंदोलनाने आणखी विरजण घातले असल्याची भावना गाव पारावरच्या चर्चेचा भाग बनली आहे.अशा आहेत अडचणीशुन्य टक्के व्याजदराचे धोरण अवलंबविताना संस्थेचे नफ्याचे प्रमाण कमी आहे. नियमित कर्ज भरणारांचे येणे व्याज शासन स्थरावरून येण्यास विलंब लागतो. व्यवस्थापन खर्चाला त्यामुळे अडचणी येतात. कर्जवाटपाचे पोटी एक टक्का संस्था व्यवस्थापन खर्चासाठी अनुदान देणार होते. ते मिळाले नाही. आधीच सचिवांचे पगार तुटपुंजे आहेत व त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक संस्थांचा पदभार आहे.