कर्जत (जि.अहमदनगर): महाराष्ट्र राज्य पणन विभागाने कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करुन संस्थेचा कारभार पाहण्यासाठी शासन नियुक्त मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कारभार वादग्रस्त ठरला होता. समितीवर अनेक आरोपही झाले होते. त्यामुळे राज्य पणन विभागाने गुरुवारी संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय घेतला.राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून व अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी यांच्या प्रयत्नातून शासन नियुक्त नूतन संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले. या नूतन संचालक मंडळाचे प्रमुख अंकुश यादव आहेत. नूतन मंडळात रामदास मांडगे, रूपचंद पोटरे, प्रकाश चेडे, शोभाचंद शिंदे, संगीता घालमे यांचा समावेश आहे. समितीची मुदत संपून वर्षाचा कालावधी झाला होता. परंतु प्रशासनाने समितीला मुदतवाढ दिली होती. (तालुका प्रतिनिधी)
कर्जत बाजार समिती बरखास्त
By admin | Updated: June 27, 2014 00:19 IST