अहमदनगर : यंदा अकोले वगळता सर्व तालुक्यांत ५० टक्केही पाऊस पडला नाही़ त्यामुळे टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे़ पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ मात्र शासनाने केवळ नऊ तालुक्यांनाच टंचाई सदृश्य परिस्थित मिळणाऱ्या सवलती जाहीर केल्या आहेत़ त्यामुळे टंचाई सदृश्य यादीतून वगळलेल्या नगर, संगमनेर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांतून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे़पावसाने नगर जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे़मान्सूनचे आगमन उशिराने झाले़ सुरुवातीचे जून आणि जुलै पूर्णपणे कोरडा गेले़ चालू महिन्यात पावसाला सुरुवात झाली़ परंतु सर्वदूर पाऊस पडला नाही़ जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात पाऊस पडला़ कमी पाऊसामुळे अकोले वगळता इतर तालुक्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ जिल्हा टंचाई शाखेच्या अहवालानुसार अकोले तालुक्यात अत्तापर्यंत ९३़ १९ टक्के इतका पाऊस पडला आहे़ उर्वरित तालुक्यांत ४० टक्के देखील पाऊस पडला नाही़ त्यामुळे टँकरनेव्दारे पाणी दिले जात आहे़ जिल्ह्यात भीषण स्थिती असताना चार तालुक्यांत टंचाई नसल्याचे शासनाचे म्हणने आहे़ शासनाने ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांची यादी नुकतीच जाहीर केली़ या यादीतून जिल्ह्यातील चार तालुके वगळले आहेत़ टंचाई सदृश्य परिस्थितीसाठी ५० टक्के पावसाचा निकष आहे़ या निकषात जिल्ह्यातील चार तालुक बसतात़ निकषात बसत असतानादेखील चार तालुके वगळून शासनाने शेतकऱ्यांच्या दुखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असून, शासनाला दुकाष्काळाचे किती गांभीर्य आहे, ते यावरून स्पष्ट होत आहे़टंचाई सदृष्य तालुक्यांची यादी शासनाने जाहीर केली़ त्यात पारनेर, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहता तालुक्यांचाच फक्त समावेश करण्यात आला आहे़ उर्वरित संगमनेर, नगर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यांचा समावेश झाला नाही़ उर्वरित वगळलेल्या तालुक्यांत ५० टक्के तर दूरचे झाले़ अवघा ४० टक्केदेखील पाऊस पडला नाही़, हे विशेष!कमी पाऊस आणि निकषात बसून या तालुक्यांना डावलण्यात आले आहेत़ टंचाईत मिळणाऱ्या सवतील या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नाहीत़ चार तालुक्यांतील शेतकरी शासनाच्या सवलतींपासून वंचित राहणार आहेत़ परंतु याच जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील शेतकऱ्यांनाचाच शासनाने विचार केला असून, उर्वरित चार तालुक्यांतील सर्वसमान्य शेतकऱ्यांना सवलीतींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झालेल्या शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)श्रीगोंदा, जामखेडकरांवर अन्यायश्रीगोंदा व जामखेड तालुक्यात आत्तापर्यंत प्रत्येकी १९ व ३१ टक्के पाऊस झाला आहे़ शासनाच्या निकषापेक्षाही कमी पाऊस पडला आहे़ मात्र हे दोन्ही तालुके टंचाई सदृश्य परिस्थितीच्या यादीतून वगळण्यात आले आहेत़ टंचाई सदृश्य यादीतून वगळलेल्या संगमनेवर व नगर तालुक्यातील गावांचा ५० पैसेपेक्षा कमी अनेवारी असलेल्या यादीत समावेश आहे़ त्यामुळे संगमनेर व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलीत मिळतील़ परंतु जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे श्रीगोंदा व जामखेड तालुक्यातील शेतकरी टंचाई सदृष्य परिस्थिती व ५० पैसे आणेवारीतील सवलतींना मुकले आहेत़ नियम काय सांगतोज्या तालुक्यांत ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्याचे प्रमाण आहे, त्या तालुक्यांत टंचाई सदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात येते़ आवश्यक त्या सवलती दिल्या जातात़ शासनाच्या या निकषात जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश होतो़ मात्र नऊ तालुक्यांना शासनाने या सवलती लागू केल्या़ उर्वरित चार तालुके वगळले आहेत़ कमी पाऊस असूनदेखील हे तालुके का वगळले असा सवाल उपस्थित होत आहे़
शेतकऱ्यांमध्ये असंतोष
By admin | Updated: August 20, 2014 23:27 IST