जामखेड : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी तालुका धनगर कृती समितीच्यावतीने गुरुवारी जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला.कृती समितीचे अध्यक्ष किसन चिलगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.‘जय मल्हार’ च्या जयघोषाने जामखेड दणाणून गेले होते. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार, खासदारांना घेराव घालून शासनाला आंदोलनाची प्रखरता दाखवून दिली जाईल व आंदोलन चालूच ठेवू, असा इशारा लोकजागृती मंचचे डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी दिला. सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भानुदास हाके तसेच इतर वक्त्यांची भाषणे झाली. धनगर समाजाच्या मागणीला शिवसेना, भाजपा, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, युवक नेते शहाजी राळेभात यांनी पाठिंबा दिला. मोर्चात आमदार राम शिंदे, डॉ. कैलास हजारे, वैजीनाथ पोले, नितीन हुलगुडे, सुखदेव खरात, सचिन मासाळ, अॅड. मच्छिंद्र कारंडे, सदाशिव हजारे तसेच धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
धनगर समाजाचा मोर्चा
By admin | Updated: August 1, 2014 00:21 IST