केडगाव : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी करीत असलेल्या प्रयत्नांना ग्रामस्थांचीही तितकीच साथ मिळणे आवश्यक असते. खंडाळा ग्रामपंचायतीने लोकसहभागातून कारभार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या गावात अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश आले आहे. पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न सोडवल्यानंतर गावात आता रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या काळात सर्वांच्या सहकार्याने गावाचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केले.
नगर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात रस्ते काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामाच्या प्रारंभी कार्ले बोलत होते.
यावेळी सरपंच मोहन सुपेकर, उपसरपंच बिभीषन लोटके, सदस्य संपत लोटके, कारभारी लोटके, राजाराम सुपेकर, गोविंद लोटके, मोहन लोटके, शुभम चहाळ, दीपक मेटे, अजित सुपेकर, ग्रामविकास अधिकारी सागावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.