देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ व सोसायटी नाक्यावरील तब्बल २१ दुकाने फोडली.पण त्यांच्या हाती अवघ्या ११ हजार रूपयांची रक्कम लागली. देवळाली प्रवरा परिसरात एकाच वेळी २१ दुकाने फोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.बाजारतळावरील १८ दुकाने व सोसायटी नाक्यावरील ३ दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. देवळाली प्रवरा बाजारतळ व सोसायटी नाक्यावर गुरुवारी पहाटे चोरटयांनी बाजारतळावरील १८ दुकाने एकामागोमाग एक फोडली. त्यामध्ये हॉटेल जयमल्हार, गायत्री कृषी सेवा केंद्र, डॉ.नेहे, केशव गोविंद इलेक्ट्रिक, हॉटेल दत्तभुवन, शाकीर पान सेंटर, मिरावली पान सेंटर, आदर्श हेअर स्टाईल, सतीश केतकर्तनालय, शांती मेन्स पार्लर, सहारा पान, कालिका भांडी भांडार, नटराज हेअरस्टाईल, आशा टी हाऊस, गुरुदत्त रसवंतीगृह, स्वामी मेडिकल, स्वामी समर्थ किराणा, दीपक गायकवाड यांची पानटपरी, स्वागत हेअर सलून, सुविधा कॉर्नर, टाईमपास पान स्टॉल, गुरुमाऊली दूध संकलन केंद्र, श्रीराम कुशन, फरीन चिकन सेंटर, सानिया चिकन सेंटर अशी तब्बल २१ दुकाने चोरटयांनी फोडून प्रत्येक दुकानातून रोख रकमेव्यतिरिक्त कोणत्याही मालाला चोरटयांनी हात लावला नाही. ही सर्व दुकाने फोडून चोरटयांना अवघे ११ हजार रुपये मिळाले आहे. ही बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आली.गेल्या शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल धनलक्ष्मीसमोर बिघाड झालेल्या ट्रक चालकास अज्ञात दोन व्यक्तींनी सुरा व गावठी कट्टयाचा धाक दाखवून ट्रक चालकाजवळील ३८ हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. या लुटीच्या गुन्ह्याचा आतापर्यंत तपास लागलेला नाही.
देवळालीत २१ दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 18:47 IST
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ व सोसायटी नाक्यावरील तब्बल २१ दुकाने फोडली.पण त्यांच्या हाती अवघ्या ११ हजार रूपयांची रक्कम लागली. देवळाली प्रवरा परिसरात एकाच वेळी २१ दुकाने फोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
देवळालीत २१ दुकाने फोडली
ठळक मुद्देनागरिक भयभीत हाती लागले अवघे ११ हजार रूपये