कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेकांचे व्यवसाय बंद झाले. सामान्य जनतेला आर्थिक अडचणींला सामारे जावे लागत आहे. अद्यापही व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव सतत वाढतच आहे. त्यातच भरीस भर म्हणून खाद्य तेलाचे भावही वाढू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने याचा विचार करून खाद्य तेलाच्या किंमतींवर नियंत्रण आणून भाव कमी करावेत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, ॲड.राजाभाऊ देशपांडे, मनोहर बागुल, चिलिया तुवर, अमिरभाई जहागीरदार, वसंत गायकवाड, विजय जगताप, नागनाथ डोंगरे, बाळासाहेब जाधव, शिवाजी फोफसे, जयराम क्षीरसागर, बाळासाहेब आगळे, अविनाश कनगरे, भिकन शेख, सोमनाथ जगताप, गुरु भुसाळफ, संजय ढगे, वसंतराव धंदक आदींनी केली आहे.
खाद्य तेलाचे भाव कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST