शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कर्जमाफीचे भरलेले अर्ज मंगळवारपासून नेटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:50 IST

अहमदनगर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ अंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकºयांनी आॅनलाइन भरलेले अर्ज मंगळवार १२ सप्टेंबरपासून शेतकºयांना इंटरनेटवर पाहावयास मिळणार आहे.

ठळक मुद्देयादी उपलब्धशेतक-यांना माहितीची पडताळणी करता येणार

अहमदनगर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ अंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी शेतक-यांनी आॅनलाइन भरलेले अर्ज मंगळवार १२ सप्टेंबरपासून शेतकºयांना इंटरनेटवर पाहावयास मिळणार आहे.‘आपले सरकार’ वेब पोर्टलवर हे अर्ज दिसणार आहेत. त्यातून शेतकºयांना आपले नाव आॅनलाइन यादीत आहे की नाही, यासोबतच आपण भरलेली माहिती अचूक आहे की नाही, याची देखील पडताळणी करता येणार आहे.४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात आपले सरकार केंद्रातून ८६ हजार ३२९ शेतकºयांनी आॅनलाइन व १९५६ आॅफलाइन, नागरी सेवा केंद्रातून १ लाख ११ हजार ५०० आॅनलाइन, १५ हजार १५० आॅफलाइन, महा ई सेवा केंद्रातून १५ हजार ६८९ आॅनलाइन व ४ हजार ८९७ आॅफलाइन असे एकूण २ लाख १३ हजार ५१८ आॅनलाइन व २२ हजार ३ आॅफलाइन अर्ज कर्जमाफीसाठी भरले गेले आहेत. या केंद्रांसोबतच जिल्ह्यात १ हजार ९५ पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत मुदत जर या यादीत आपले नाव नसेल, तर अशा शेतक-यांना पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत आपला अर्ज आपले सरकार वेब पोर्टलवर तातडीणे भरणे आवश्यक आहे. कोणत्याही शेतक-यांना याबाबत काही अडचणी आल्यास त्यांनी तालुका स्तरावरील सहायक निबंधकांशी संपर्क साधावा.-अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.४ लाख ८५ हजार जणांची नावनोंदणीथकबाकीदार शेतक-यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याच्या सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा सहकारी बँकेने १३ हजार ७७३ शेतकºयांना १३ कोटी १३ लाख ७९ हजार रुपये मंजूर केले आहेत. यापैकी ५ हजार २२६ शेतकºयांनी ५ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष घेतली आहे. व्यापारी बँकांनी २५० शेतक-यांना २५ लाख मंजूर केले असून, ही कर्जाची रक्कम शेतक-यांनी पूर्णपणे घेतली आहे. या कर्जासाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती.१० सप्टेंबरअखेर जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार ४१६ शेतकºयांची नावनोंदणी झाली आहे. तर २ लाख ३३ हजार ८६३ अर्ज आॅनलाइन अपलोड झाले आहेत.जिल्ह्यातील ५ लाख ६८ हजार ८६८ शेतकºयांना २६४०.०९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.