चारित्र्याच्या संशयावरून खून : एक वर्षाच्या आत निकालअहमदनगर : चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या इस्लामउद्दिन सद्दीत अन्सारी (वय ६५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) याला प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत द. कुलकर्णी यांनी शनिवारी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायालयातील गेल्या पाच वर्षातील तिसरी तर दोन महिन्यातील ही दुसरी फाशीची शिक्षा ठरली आहे.घटनेच्या दिवशी म्हणजे १ मे २०१५ रोजीच्या मध्यरात्री मयत अल्पवयीन मुलगी गुलअब्सा (वय १७), तिची दुसरी बहीण नर्गिस, मुलगा, सून, आई आणि वडील असे चौघे घरात झोपले होते. त्यापैकी मयत मुलगी घरातील एका स्वतंत्र खोलीत झोपली होती. घटनेच्या रात्री मयत मुलगी एक वाजता घरातून निघून गेली आणि रात्री २.३० वाजता घरात परत आली. सकाळी सहाच्या सुमारास आरोपीने मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी आलेल्या आवाजाने मुलीची आई धावत-पळत खोलीत गेली. मुलीच्या आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने काहीही न ऐकता तिला मारहाण करीत व गळा आवळून मुलीचा खून केला. यावेळी आरोपीसह सर्वच घरात होते. त्यानंतर आरोपी पळून गेला. दरम्यान, अज्ञात इसमाने राहुरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. मुलीच्या आईच्या जबाबावरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुनील अंबादास आहेर यांनी फिर्याद दाखल केली. श्रीमती आर. एस. चव्हाण यांनी तपास करून २१ जून २०१५ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या नियमित सुनावणीला ६ जानेवारी २०१६ पासून प्रारंभ झाला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल डी. सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले. त्यातील तीन साक्षीदार फितुर झाले. तरीही सरकार पक्षाचा पुरावा व भक्कम युक्तिवादाच्या आधारे आरोपी इस्लामउद्दिन सद्दीत अन्सारी यास फाशीची शिक्षा ठोठावली. नातेवाईक फितूरस्वत:च्या मुलीचा खून करणाऱ्या वडिलांच्याविरुद्ध सुरवातीला जबाब देणाऱ्या मयत मुलीची आई, बहीण मुलगा हेच या खटल्यात फितूर झाले होते. मागच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. तेथून कोण आले आणि कोणी खून केला, याची माहिती नाही. त्यामुळे वडील निर्दोष असल्याचे सांगत तिघेही फितूर झाले. मात्र, सरकारी वकील अॅड. सरोदे यांनी खुनाचे कारण उलगडल्यानंतर साक्षीदारांनी खरी माहिती दिली. वडील आणि पतीविषयी प्रेम असल्यानेच खोटे बोललो, असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आरोपीविरुद्धचे पुरावे भक्कम झाले. अत्यंत कमी कालावधीत सुनावणी प्रक्रिया होवून आरोपीला शिक्षा झाली आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्याकडून उच्च न्यायालयाला या शिक्षेबाबत कळविण्यात येते. त्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी कुठे व कशी करायची, याचा निर्णय घेतला जातो.कौटुंबिक आरोपी वाढलेअलीकडच्या काळात कौटुंबिक आरोपींची संख्या वाढली आहे, ही सामाजिकदृष्ट्या गंभीर बाब आहे. खून, अत्याचार अशा प्रकरणातील आरोपी हे पती, वडील, मुलगा अशा नात्यातले आहेत. जिल्'ात वर्षभरातील फाशीची ही चौथी शिक्षा आहे. गुन्हा सिद्धतेनंतर जिल्हा न्यायालयात शिक्षा लागण्याचे प्रमाण राज्यात अव्वल आहे, असे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी सांगितले. अकरा महिन्यात निकालसदरच्या खटल्याची चार महिन्यात सुनावणी पूर्ण झाली, तर घटनेपासून अकरा महिन्यात निकाल लागला. मयत मुलीची बहीण, आई फितूर होवूनही प्रबळ पुरावे सादर केले. खून कोणी केला, याची माहिती नाही, अशी तिघांनी दिलेली साक्ष कशी खोटी आहे, हे न्यायालयाला पटवून देण्यास यशस्वी झालो. ‘आॅनर किलिंग’ प्रकरणात आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यात दिलेले आहे. त्याचा आधार घेवून आरोपीविरुद्ध प्रबळ युक्तिवाद करता आला. रासायनिक पृथ्थकरण अहवाल, मारहाणीसाठी वापरलेले लाकडी दांडके, तपास अधिकारी श्रीमती आर. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. वैरागर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला.-अॅड. अनिल सरोदे (अतिरिक्त सरकारी अभियोक्ता )
मुलीच्या खुनाबद्दल वडिलांना फाशी
By admin | Updated: April 16, 2016 23:15 IST