शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:33 IST

अकोले : तालुक्यातील वीरगाव शिवारात मृतावस्थेत आढळलेला बिबट्या हा दोन बिबट्यांच्या झुंजीत मरण पावला असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.

अकोले : तालुक्यातील वीरगाव शिवारात मृतावस्थेत आढळलेला बिबट्या हा दोन बिबट्यांच्या झुंजीत मरण पावला असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, स्थानिक साक्षीदारांच्या समोर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतरच बिबट्या हलविण्यात आला, असे वनविभागाचे म्हणणे आहे. वीरगार येथे गुरुवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. ग्रामस्थांनी वनविभागाला सकाळी ही बाब कळविल्यानंतर विभागाचे पथक घटनास्थळी थेट दुपारनंतर दाखल झाले. सायंकाळी पत्रकारांना छायाचित्रे घेऊ न देता घाईघाईने बिबट्याचे शव हलविण्यात आले. वनविभागाच्या या भूमिकेमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला. बिबट्या जेथे आढळून आला तेथे रणकंदन झाल्याच्या खूना असून बिबट्याच्या अंगावर ओरबडल्याच्या खूना होत्या. परिसरात दोन बिबटे असल्याचे झुंजीवरुन आणि परिसरातील लोकांच्या सांगण्यावरुन स्पष्ट झाल्याने क्रोधीत झालेल्या बिबट्याने पुन्हा हल्ला करु नये म्हणून मृत बिबट्यास तातडीने सुगाव रोपवाटीकेत आणले. त्या परिसरातील दोन साक्षीदार घेवून स्पॉट पंचनामा केल्यानंतर बिबट्याला सुगाव रोपवाटीकेत आणले गेले. श्वविच्छेदन करुन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले,मोबाईलवर फोटो व्हायरल होऊन गर्दी वाढेल या भितीपोटी पत्रकारांना छायाचित्रे घेऊ दिली नाहीत असे वन अधिकाऱ्याने सांगितले.वीरगाव येथे आढळून आलेल्या मृत बिबट्याचे शवविच्छेदन मी केले. दोन बिबट्यांच्या भांडणात त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. माझे समोरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.-डॉ.आर.डी.भांगरे,प्रभारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तथा पशुधन विकास अधिकारी अकोले