श्रीगोंदा : तालुक्यातील घोडेगाव येथे वीजेच्या खांबावरुन पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली़घोडेगाव येथील राजेंद्र सोनबा निकम (वय ३८) हे घोडेगाव शिवारातील होंडामाळ येथील विजेच्या खांंबावर दुरुस्तीसाठी चढले होते़ मात्र, त्यांचा पाय निसटल्यामुळे ते खाली पडले़ यात त्यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे़रविवारी शेंडेवाडी येथे वीजेच्या धक्क्याने काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एका शेतकºयाला जीव गमवावा लागला़ त्यामुळे महावितरणच्या विरोधात शेतक-यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ दोन दिवसात विजेचा धक्का बसून तिघांचा बळी गेला आहे़
विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:04 IST