शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

दारणा-गंगापूरचे पाणी जायकवाडीला सोडू नये

By admin | Updated: February 3, 2024 11:04 IST

कोपरगाव : नाशिक-नगर विरूद्ध मराठवाड्याच्या पाटपाण्याच्या भांडणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संजीवनी साखर कारखान्याने दारणा, गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्यास न सोडता

 कोपरगाव : नाशिक-नगर विरूद्ध मराठवाड्याच्या पाटपाण्याच्या भांडणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संजीवनी साखर कारखान्याने दारणा, गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्यास न सोडता येथील शेतीसाठी मिळालेच पाहिजे, असे म्हणणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर दाखल केल्याची माहिती अ‍ॅड़ प्रमोद पाटील व अ‍ॅड़ व्ही़ एम़ थोरात यांनी दिली़ मुंबई उच्च न्यायालयात पाटपाण्याचा तंटा सुरू असून न्यायमूर्ती मोहित शहा व संकलेचा यांनी दि़ ५ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान जलसंपत्ती प्राधिकरणाने न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांचा विचार न करता आ़ प्रशांत बंब व वाय़ आऱ जाधव यांनी दाखल केलेल्या मागण्यांसदर्भात दि़ ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी निर्णय घ्यावा व या संदर्भात दाखल झालेल्या एक ते नऊ याचिकाकर्ते यांनी त्यांचे म्हणणे दोन पानांत प्राधिकरणासमोर सादर करावे, त्या प्रमाणे संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले़ महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणासमोर आता ४ जून रोजी सुनावणी होणार आहे़ तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिकांची थेट ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे़ संजीवनी कारखान्याच्या वतीने पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने एकीकडे समन्यायी पाणी वाटपाबाबत नियम १२ (६) (क) प्रत्यक्षात वर्केबल नाही, असे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून दिले आहे़ तर नियम १ च्या १६ (अ) प्रमाणे विभागवार पाणी वाटपाचे सूत्र ठरलेले नाही़ असेही म्हटले आहे़ गोदावरी कालव्यावरील बारमाही ब्लॉकधारक शेतकर्‍यांना हक्काचे पाणी न मिळाल्यामुळे फळबागांचे ११३४, तर ऊस पिकांचे ३०० कोटी असे एकूण १४३४ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे़ जायकवाडीत सध्या ११ टिएमसी जीवंत पाण्याचा साठा उपलब्ध आहे़ दारणा, गंगापूर धरणांमधून नदीपात्रातून मराठवाड्यासाठी सोडले जाणारे पाणी उन्हाळयाची तीव्रता, पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही़ मग पाणी सोडण्याचा खटाटोप कशासाठी, असेही संजीवनीने म्हटले आहे़ नगर-नाशिक विरूद्ध मराठवाडा पाटपाण्यासंदर्भात सध्या मुंबई उच्च न्यायालयात नऊ जनहित याचिका, तर १७ हस्तक्षेप अर्ज दाखल झालेले आहेत़ (प्रतिनिधी)