शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

दरेवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; महिलेच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:52 IST

दरेवाडी (ता. नगर) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत लुटमार केली. दरोडेखोरांनी एका महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातला.

अहमदनगर : दरेवाडी (ता. नगर) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत लुटमार केली. दरोडेखोरांनी एका महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातला.दरेवाडीतील हरि-कृष्णनगर येथे ज्ञानदेव बेरड यांचे किराणा दुकान आहे. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दुकानामागील घराचा दरवाजा तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरवाजा उघडल्याचा आवाज आल्याने ज्ञानदेव यांच्या पत्नी दीपाली जाग्या झाल्या. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातला. या आवाजाने घरातील लहान मुलेही उठली. त्यामुळे मोठा आरडाओरडा झाला. ते पाहून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र जाताना त्यांनी दीपाली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. दरोडेखोरांनी दीपाली यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातल्यामुळे त्यांच्या डोक्यात ११ टाके पडले आहेत. बुधवारी सकाळी भिंगार पोलीस, सरपंच अनिल करांडे यांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मंगळवारी ज्ञानदेव बेरड हे बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची लहान मुले, पत्नी व वृद्ध आई, वडील होते. त्यामुळे पाळत ठेऊनच हा दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस