शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रांवर उफळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST

अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी भल्या सकाळीच रांगा लावल्या होत्या. मात्र पुरेशी ...

अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी भल्या सकाळीच रांगा लावल्या होत्या. मात्र पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लस मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

महापालिकेच्या वतीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. कोव्हॅक्सिन लस गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध होत नव्हती. महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर ही लस उपलब्ध झाली. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोव्हॅक्सिन लस मिळणार असल्याने नागिरकांनी महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रांवर गर्दी केली होती. परंतु, डोस ५० आणि नावनोंदणी ३०० ते ४०० ,अशी अवस्था होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सावेडी आरोग्य केंद्रात ६० डोस मिळाले होते. परंतु, तेथील निम्मे म्हणजे ३० डोस कॉटेज कॉर्नर येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात पाठविण्यात आली. त्यामुळे ३० जणांना डोस देऊन इतरांना डोस संपले असल्याचे सांगण्यात आले. संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला असता वरिष्ठांचा आदेश असल्याने निम्मे डोस इतरत्र पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तासन्‌तास रांगेत उभे राहून डोस न मिळाल्याने नागिरकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. दरम्यान, महापालिकेच्या माळीवाडा येथील केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु, तेथील लस संपली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर ६० वर्षांपुढील नागरिकांनाच फक्त लस दिली जाईल, असे प्रशसानाकडून ध्वनिक्षेपकाव्दारे जाहीर केले गेले. तसेच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गर्दी नियंत्रणात आली. पुरेसे डोस उपलब्ध न झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

.......

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राज्य सरकारकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र गेल्या शनिवारपासून ही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांचे लसीकरण प्रशासनाकडून बंद करण्यात आले असून, ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच फक्त लस दिली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.