संगमनेर : वनजीव सप्ताहांतर्गत बिबट्या प्रवण क्षेत्रातील नागरिकांना ‘वाघोबाचा खटला’ ही जवळ-जवळ ४५ मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामस्थांचे वन्यजीवांविषयी प्रबोधन सुरू आहे. अनेक गावात दरारोज संध्याकाळी दाखविण्यात येत असलेली ही चित्रफित पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मोठी गर्दी क रीत आहेत.बुधवारी तालुक्यातील नागरिकांनी वन्यजीव सप्ताहाची माहिती होण्यासाठी दुचाकी फेरीच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. वनपरिक्षेत्राधिकारी बाळासाहेब गीते, प्रकाश सुतार, निलेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या फेरीत आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, वन कर्मचाºयांचासह नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होते. धांदरफळ, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, जवळे कडलग, राजापूर, कासारा दुमाला, गुंजाळवाडी, घुलेवाडी, समनापूर, कोक णगाव, कोंची, निमगावजाळी,जोर्वे, कोल्हेवाडी, निमगावजाळी, आश्वी आदी गावांसह संगमनेर शहरातून ही फेरी नेण्यात आली.गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्याच्या दृष्टीने तो वावरत असलेली जागा ही त्याचीच असते, पण माणसाच्या दृष्टीने ती जागा माणसाची असते. त्यातूनच संघर्ष वाढला आहे. तो पुढेही वाढणार आहे. हा संघर्ष कमी होऊन तो माणसाला त्रासदायक ठरणार नाही. वन्यजीवांची माहिती व जीवनक्रम समजावून सांगत त्यांच्याबद्दलचे नागरिकांच्या मनातील गैरसमज फेरीद्वारे दूर करण्यात आले. वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास विरोध दर्शवावा याविषयीची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी गीते, सुतार, आखाडे यांनी नागरिकांना दिली.मानव आणि वन्यजीवात मैत्री काळाची गरजपृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे वन्यजीव व मानव यांच्यात लढा उदभवतो. मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही काळाची गरज बनली. संगमनेर तालुक्यात वन्यजीव सप्ताहा दरम्यान १ ते ७ आॅक्टोबर या काळात उपविभागीय वनाधिकारी मच्ंिछद्र गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बिबट्या: समस्या व उपाययोजना याची माहिती भिंत्तीपत्रक व फलकाद्वारे देण्यात आली. बिबट्याचे राहण्याचे ठिकाण, त्याची वैशिष्ट्ये, खाद्य व मानवी वस्ती, हल्ल्याची पद्धत, बिबट्यासाठी लावलेला पिंजरा, त्याला असलेले गर्दीचे वावडे, बिबट्यापासून सुरक्षिततेचे उपाय आदींबाबत यावेळी प्रबोधन करण्यात आले.
‘वाघोबाचा खटला’ पाहण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:59 IST