याप्रश्नी तातडीने बँकेच्या शाखेत कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नवीन कर्मचारी नसल्याने उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिक ताण पडत आहे. गावात विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने कर्जवाटप झाले आहे. कर्जाची रक्कम घेण्यासाठी व भरणा करण्यासाठीदेखील ग्रामस्थांची मोठी गर्दी होत आहे. बँकेत कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टाकळी ढोकेश्वर गावाचा विस्तार मोठा असल्याने बँकेत व्यवहार व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी असते. या बँकेत कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
------फोटो - २०टाकळी ढोकेश्वर
पारनेर तालुक्यातील टाकळी,ढोकेश्वर येथील जिल्हा सहकारी बँकेसमोर ग्रामस्थांची झालेली गर्दी.