शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मांडीवर बसून जेवतो कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:30 IST

सध्या पितृ पंधरवाडा सुरु आहे़ रोजच कोणाच्या तरी घरापुढे पितराला जेऊ घालण्यासाठी धडपड सुरु असल्याचे दिसते. 

पुंडलीक नवघरेकोळपेवाडी : सध्या पितृ पंधरवाडा सुरु आहे़ रोजच कोणाच्या तरी घरापुढे पितराला जेऊ घालण्यासाठी धडपड सुरु असल्याचे दिसते. एरवी हातातील घास घेऊन पळणारा कावळा मात्र वेळेवर रूसतो अन् नाइलाजास्तव गायीला घास द्यावा लागतो़ हल्ली असे चित्र सगळीकडेच बघायला मिळते. पण लकडे बाबांची गोष्टच न्यारी. पक्वानांचे ताट हातात घेऊन ते बसले की कावळा हमखास येणाऱ तोही अगदी मांडीवर बसणार आणि ताटातील अन्नावर यथेच्छ ताव मारुन तृप्त मनाने भरारी घेणार, असे सुखद चित्र कोळपेवाडीत पहायला मिळते.चंद्रकांत हरिभाऊ लकडे. गंध नाही, टिळा नाही़ ‘लकडे बाबा’ नावाने ते परिचित. कोळपेवाडी गावकुसाला त्यांची शेती. त्यातच वनराईने नटलेली वस्ती. या वनराईत पशु पक्ष्यांचा मुक्त संचार. लकडे बाबा सांगतात, ‘आपले सण उत्सव धार्मिक विधी हे निसर्गातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असतात. निसर्गाने, पशुपक्ष्यांनी मानव जातीवर जे उपकार केलेले असतात, त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न सण, उत्सवांतून होत असतो़ कावळ्याला पितरांची उपमा त्यातूनच दिलेली आहे. पितृ पक्षात अथवा दशक्रिया विधीत अन्नदान केले जाते़ या अन्नदानावर पशुपक्ष्यांचाही अधिकार असतो़ म्हणून कावळ्याला हा मान दिला जातो़’कावळ्यांना लागला लळामाणसाच्या सावलीलाही भिणारा कावळा थेट लकडे बाबांच्या मांडीवर बसून ताटातील अन्न खातो़ कावळ्यांना एव्हढा तुमचा लळा कसा लागला याबाबत विचारले तर ते म्हणाले, ‘यासाठी वर्ष दीड वर्ष लागले़ विहिरीच्या कडेला एक मोठ्ठे झाड आहे़ त्यावर कावळ्याचा खोपा होता. त्यात दोन पिल्ले होती़ एक दिवस कावळा घरट्यात नसताना कोकीळने कावळ्याचे पिल्लू लोटून दिले. हा प्रकार माझ्या लक्षात आला. पिलाला स्पर्श न करता मी ते कापडी पिशवीत घालून त्याला अलगद खोप्यात सोडले. तोच हा कावळा़ त्याचे आता स्वतंत्र कुटुंब आहे. हळूहळू हे माझ्या जवळ आले. आता हे अगदी माझ्या अंगाखांद्यावर येऊन बसतात. ताटातील अन्न खातात. पण मी बाहेर असलो तरच ते माझ्या जवळ येतात़ घरात ते कधीच येत नाहीत.’

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर