शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

‘पारनेर’ विक्रीचे संकट तूर्त टळले

By admin | Updated: June 12, 2014 00:10 IST

पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर विक्रीचा राज्य बँकेचा डाव फसला.

पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर विक्रीचा राज्य बँकेचा डाव फसला.दरम्यान उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भातील याचिका निकाली काढली असून ‘पारनेर’ विक्रीचे संकट तूर्त टळले आहे.आता जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे दाखल केलेल्या याचिकेवर बारा जूनला सुनावणी होणार आहे.पारनेर साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला होता व त्याची निविदा प्रसिध्द केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आ.विजय औटी व कामगार व शेतकऱ्यांच्या वतीने सुभाष बेलोटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्री विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली होती. पूर्वीचे अवसायक अधिकाऱ्यांनी पारनेर कारखान्यावर २९ कोटीचे कर्ज दाखवले असतांना राज्य बँकेने मात्र ८० कोटींचे कर्ज निविदेमध्ये प्रसिध्द केले आहे अशी भूमिका न्यायालयात मांडली आहे. याचिकेवर सुनावणी झाल्यावर राज्य बँकेच्या वतीने न्यायालयात अद्याप याप्रकरणी कोणतीही निविदा दाखल झाली नसल्याने ही विक्री होणार नाही असे सांगितले.यावेळी राज्य बँक परस्पर कारखाना विक्री करेल असा धोका अण्णा हजारे,आमदार विजय औटी यांच्या वकिलांनी मांडल्यावर विक्री बाबत किंवा इतर निर्णयाबाबत राज्य बँक पुन्हा नोटीस काढेल असे राज्य बँकेने न्यायालयात स्पष्ट केले.न्यायालयाने याबाबतच्या तिन्ही याचिका निकाली काढल्या. विक्रीसाठीच्या निविदाच न आल्याने सध्याचे विक्रीचे संकट टळणार आहे.यामुळे कामगार,शेतकरी यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.(तालुका प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची समिती निर्णय घेणारराज्यातील बंद पडलेले साखर कारखाने राज्य बँकेने विक्री करू नये ते सहकारी संस्थांना दीर्घ कालावधीच्या भाडेतत्वावर द्यावे असा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आग्रह धरला असून त्यामुळे पारनेरची विक्री होणार नाही. कृषिमंत्री विखे व माजी आमदार नंदकुमार झावरे यांची याबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आली आहे़ ही समिती पारनेर कारखाना विक्रीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती जिल्हा काँगे्रसचे उपाध्यक्ष राहुल झावरे यांनी दिली़प्राधिकरणाकडे याचिकाजिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायाधिकरणाकडे पारनेर साखर कारखान्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी (दि़१२) होणार आहे. या सुणावणीत काय निर्णय होतो याकडे तालुक्याचे लक्ष आहे.