कोपरगाव : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील भाजपा संपर्क कार्यालयासमोर परवानगी न घेता गर्दी करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाभाजी करीत निदर्शने केली, तसेच गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
याप्रकरणी पोलीस हवालदार संभाजी शिंदे यांनी आंदोलनकर्ते भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहाम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, अविनाश पाठक, रवींद्र पाठक, शिवाजी खांडेकर, सत्येन मुंदडा, कैलास खैरे, सुशांत खैरे, बाळासाहेब दीक्षित, सुजल चंदनशिव, गोपीनाथ गायकवाड, संजू खराटे, रवी रोहमारे, कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही ) यांच्यासह इतर ५ ते ७ अनोळखी व्यक्ती (सर्व रा. कोपरगाव ) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय पवार करीत आहेत.