शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नगर क्लबच्या मैदानावर रंगणार क्रिकेट सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

अहमदनगर : पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशनतर्फे पंजाबी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. ...

अहमदनगर : पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशनतर्फे पंजाबी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी प्रदीप पंजाबी, काकाशेठ नय्यर, आगेश धुप्पड, हरजीतसिंह वधवा, जनक आहुजा, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, अनिश आहुजा, मोहित पंजाबी, सावन छाबरा, हर्ष बत्रा, सागर पंजाबी, डॉ.अभिषेक वाही, सनी आहुजा, कैलाश नवलानी, कमल कोहली, विजय बक्षी, अमरिश सहानी, विशाल बक्षी, राजेश सबलोक उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील पंजाबी समाज एकवटला गेला. मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटात घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून गरजूंना दोन वेळचे जेवण पुरवून लाखो कुटुंबीयांना पंजाबी समाजाने मोठा आधार दिला. ही भावना व कार्य या खेळाच्या मैदानातून निर्माण झाले होते. जीवनात खेळाडूवृत्ती महत्त्वाची आहे.

प्रास्ताविकात हरजीतसिंह वधवा यांनी समाजाला जोडण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. यामध्ये १४ वर्षांपासून साठ वर्षांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना संधी देण्यात आली आहे, तसेच या वर्षी महिलांचे संघही या स्पर्धेत उतरले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे नियम मनोरंजनात्मक आहेत.

पंजाबी प्रीमीयर लीगचे हे तिसरे वर्ष असून, या स्पर्धेत १० संघांचा समावेश आहे. दिवसा, तसेच रात्री फ्लड लाइटमध्ये या स्पर्धा होणार आहे. नाणेफेक हरणारा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. एक षटक ५ चेंडूंचा असून, प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकणे बंधनकारक आहे. १५ धावा करणारा फलंदाज रिटायर होतो. अशा अनेक मनोरंजनात्मक नियमांचा समावेश या क्रेझी क्रिकेटमध्ये आहे, तर यावेळी महिलांच्या संघांनाही प्रवेश देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मकतेचे सर्व नियम पाळून क्रिकेटचे सामने होत आहेत. विजेत्या संघास व उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र ओबेरॉय यांनी केले. आभार सावन छाब्रा यांनी मानले.

--फोटो- ०६पंजाबी क्रिकेट

पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रदीप पंजाबी, काका नय्यर, आगेश धुप्पड, हरजीतसिंह वधवा, जनक आहुजा, हितेश ओबेरॉय आदी.