शेवगाव : नवी दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे, असा आरोप करत या कृतीच्या निषेधार्थ शनिवारी (दि.६) अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने शनिवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत जिल्ह्यात हे देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे यांनी दिली. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे, असे अत्याचार केंद्र सरकार शेतकरी आंदोलकांवर करत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
भाकपचे आज जिल्हाभर चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST