शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात कोविड केअर, हेल्थ सेंटर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST

कोपरगाव : तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित केली, असल्याची माहिती ...

कोपरगाव : तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित केली, असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

ग्रामीण रुग्णालय येथे कोविड हेल्थ उपचार, बाळंतपण आणि शस्त्रक्रिया याची स्वतंत्र दालने तयार करण्यात आली आहे. या करिता स्वतंत्र प्रवेशद्वार असणार आहे. तशा आशयाचे फलक तेथे लावण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ केअर सेंटर २० खाटांचे उपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक विभाग स्वतंत्रपणे तयार करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे आवारात औषध भांडार ईमारतीत कोरोना संसर्ग चाचणी दैनंदिन सकाळी ९ ते १२ या वेळेत होत आहे. तसेच तालुक्यातील नोंदणी झालेल्या ६० वर्षांपुढील व दुर्धर आजार असणारे ४५ वर्षांपुढील नागरिकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत ग्रामीण रुग्णालय येथे देण्यात येणार आहे. ४५ वयोगटापुढील ईतर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरणाची नोंदणी केली असल्यास निर्धारित केंद्रावर दिलेल्या तारखेला जातांना वैद्यकीय प्रमाणपत्र व सुरू असलेल्या उपचाराची कागदपत्रे सोबत घेऊन जावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.