शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:20 IST

अहमदनगर : शहरासह जिल्हाभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ असतानाच नागरिक संकटात आहेत. या संकटाचा संधी म्हणून गैरफायदा घेत काही प्रयोगशाळांनी ...

अहमदनगर : शहरासह जिल्हाभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ असतानाच नागरिक संकटात आहेत. या संकटाचा संधी म्हणून गैरफायदा घेत काही प्रयोगशाळांनी (डायग्नोस्टिक सेंटर) रुग्णांची लूट चालविली आहे. कोरोनाकाळात रुग्णांची होणारी लूट लक्षात घेता सरकारने विविध चाचण्यांचे दर निश्चिच केले असले तरी नफा कमाविण्यासाठी खासगी प्रयोगशाळांकडून शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखविली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत आहे. सरासरी चार हजार रुग्ण रोज पॉझिटिव्ह येत आहेत. त्यातच गत महिन्यात कोरोनाबाधितांचे मृत्यू वाढले होते. ऑक्सिजनची पातळी कमी होणे, फुफ्फुसाचा संसर्ग यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. थोडाफार काही त्रास झाला तरी नागरिक विविध चाचण्या केल्या जात आहेत. त्याचा गैरफायदा काही खासगी प्रयोगशाळाचालक घेत असल्याचे अनुभव अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना येत आहेत.

मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी होत असल्याने नागरिकांमध्ये रोगनिदान केंद्रांविषयी संताप व्यक्त होत आहे. काही नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत अशा रोगनिदान केंद्रांची भांडाफोडही करीत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या संस्थांवर शासन व प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसते आहे.

---------

एजंटांची टक्केवारी वेगळीच

१) सरकारने रोगनिदान केंद्रांना दर कमी करून अडीच हजार रुपये करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, गर्दीचा फायदा घेत रोगनिदान केंद्रांकडून अजूनही चार ते पाच हजार रुपये आकारले जात आहेत. विशेष म्हणजे गर्दीत लवकर नंबर लावून देण्यासाठी अशा लॅब बाहेर एजंट कार्यरत असल्याचेही दिसून येते.

२) काही दिवसांपूर्वी एका प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये तफावत आढळल्याने एक खासगी लॅबही संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्या लॅबविरुद्ध तक्रारही दाखल आहे. मात्र, त्याची पुढे चौकशीच झाली नाही.

३) शहरात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्या खासगी लॅब आहेत. मात्र, या वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगवेगळे दर आकारले जात आहेत. यात चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, काही एजंट वाढीव पैशांची मागणी करून अहवाल लवकर देण्याचेही सांगतात.

----

नियंत्रण कोणाचे ?

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी आ‌वश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना वेगवेगळ्या डायग्नोस्टिक सेंटरकडून रुग्णांची लूट होत असताना आरोग्यव्यवस्था व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या या डायग्नोस्टिक सेंटरवर कोणाचेही नियंत्रण उरले नसल्याचे दिसून येत आहे.

--

चाचण्या आणि दर

चाचणी - लॅब-१ लॅब-२ लॅब-३

अँटिजन - २५०० १५०० १०००

आरटीपीसीआर - ३००० १८०० १२००

एचआरसीटी ४००० २५०० ३५००

--------

डमी- नेट फोटो

११ पॅथालॉजी रेट डमी

लॉब