शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

अकराशे जणांना जप्तीच्या नोटिसा

By admin | Updated: February 24, 2016 23:42 IST

अहमदनगर: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या अकराशे मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

अहमदनगर: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या अकराशे मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बुधवारी सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने वसुलीसाठी वाजंत्री वाजविली. अन्य प्रभाग समिती कार्यालयाची वाजंत्री बुधवारी बंद होती. नगर शहरातील मालमत्ताधारकांकडे महापालिकेची १३६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. गत अकरा महिन्यात केवळ ३२ कोटी रुपयांची वसुली झाली. थकबाकी वसुलीसाठी शास्तीमाफीची सवलत तीन महिने देऊनही फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता जप्ती, नळजोड तोडणी मोहीम हाती घेण्याची सूचना आयुक्त विलास ढगे यांनी केली. त्यानुसार उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी प्रभाग समिती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या अकराशे मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची नावेही महापालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयाचे अधिकारी एस.बी.तडवी यांनी वसुलीसाठी ढोल पथक ३१ मार्चपर्यंत बुक करून ठेवले आहे. या पथकाने बुधवारी मनमाड रस्त्यावरील व्यावसायिकांच्या दुकानासमोर ढोल वाजविले. पथक दुकानासमोर पोहचताच थकबाकी वसुलीचा धनादेश अधिकाऱ्यांना देण्यात आला. सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने दिवसभरात सहा लाख रुपयांची वसुली केली. बुरूडगाव प्रभाग समिती कार्यालयानेही पाच लाख रुपयांची वसुली केली. (प्रतिनिधी)