शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसचे दोन नगरसेवक गायब महापौर बदलाच्या हालचाली

By admin | Updated: June 2, 2015 16:19 IST

अहमदनगर: आमदार संग्राम जगताप यांनी महापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर ८ जून रोजी नव्या महापौराची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडी व युतीत नगरसेवक फोडाफोडीची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. फोडाफोडीच्या राजकारणात युती दोन पावले पुढे गेली असून सहलीवर गेलेल्या आघाडीच्या नगरसेवकांमध्ये कॉँग्रेसच्या दोघांचा समावेश नाही. हे नगरसेवक युतीच्या गोटात सामील झाल्याची चर्चा आहे. मात्र आमचे नगरसेवक सहीसलामत असल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे.

अहमदनगर: आमदार संग्राम जगताप यांनी महापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर ८ जून रोजी नव्या महापौराची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडी व युतीत नगरसेवक फोडाफोडीची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. फोडाफोडीच्या राजकारणात युती दोन पावले पुढे गेली असून सहलीवर गेलेल्या आघाडीच्या नगरसेवकांमध्ये कॉँग्रेसच्या दोघांचा समावेश नाही. हे नगरसेवक युतीच्या गोटात सामील झाल्याची चर्चा आहे. मात्र आमचे नगरसेवक सहीसलामत असल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. महापौर पदाचा खांदेपालट करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. ८ जून रोजी नव्या महापौराची निवड होत आहे. आघाडीचे संख्याबळ कमी करण्यासाठी युतीने त्यांचे नगरसेवक गळाला लावले असून त्यांना गायब केले आहे. सेनेेचे नगरसेवक शनिवारी तर भाजपाचे सोमवारी मुंबई सहलीवर गेले आहेत. युतीने नगरसेवकांची फोडाफोडी सुरू केल्याचे समजाताच आघाडीने त्यांचे नगरसेवक सुरक्षितस्थळी रवाना केले. मात्र त्यात कॉँग्रेसचे दोन नगरसेवक नाहीत. कॉँग्रेसचे दोन नगरसेवक गायब झाले असून ते युतीच्या गोटात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. युतीच्या गोटातील हे नगरसेवक पुन्हा स्वगृही आणण्यासाठी आघाडीने शोधाशोध सुरू केली आहे. आघाडीचे नगरसेवक आमच्याच सोबत असून महापौर आमचाच होईल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. .............सहा-सहा महिन्याचा प्रस्तावदरम्यान आघाडीतील नाराज असलेल्या नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सहा-सहा महिने महापौर पदाची संधी मिळावी, येणारा खर्चही विभागून द्यावा अशी मागणी आमदार जगताप यांच्याकडे केली आहे. बोराटे यांनाही महापौर होण्याची इच्छा आहे. पहिले सहा महिने कळमकर तर दुसरे सहा महिने महापौर पदाची संधी मिळावी असे बोराटे यांचे म्हणणे आहे. बोराटे यांच्या या प्रस्तावावर जगताप यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे नाराज बोराटे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. .................निरीक्षक घेणार कॉँग्रेसचा निर्णयमहापालिकेत कॉँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ ११ आहे. दोन अंकी संख्याबळ असले तरी सत्तेत फक्त उपमहापौर पद वाट्याला आले आहे. त्यातच पक्षाच्या नगरसेवकांची सत्तेत असूनही कामे होत नाही, त्यामुळे पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा असे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी प्रदेशला कळविले आहे. त्यानुसार प्रदेशने निरीक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या अहवालानंतर कोणासोबत जायचे हे ठरविले जाणार असल्याचे समजते.