अहमदनगर : शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी महापालिकेत सांस्कृतिक व क्रीडा समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी युवा नाट्यकर्मी अमित गटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारी दिली.
महापौर वाकळे यांच्या हस्ते अमित गटणे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष महेंद्र गंदे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, भाजप मध्यमंडळाध्यक्ष अजय चितळे, नितीन बारस्कर, सतीश शिंदे, पुष्कर कुळकर्णी, अभिजित चिप्पा, किशोर कानडे, आदी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष युवा नाट्यकर्मी अमित शशिकांत गटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे पदसिद्ध सचिवपदी उपायुक्त यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यपदी शशिकांत नजान मधुसूदन मुळे, सतीश लोटके, अमोल खोले, पी. डी. कुलकर्णी, श्याम शिंदे, श्रेणीक शिंगवी, सुमित कुलकर्णी, स्वप्निल मुनोत, अंजली वल्लाकट्टी, विराज मुनोत, नीलेश सुभाष जाधव, शारदा होशिंग यांची निवड करण्यात आली आहे.
...
सूचना फोटो: ०१ गटणे नावाने आहे.
...
महापालिका सांस्कृतिक व क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अमित गटणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र देताना महापौर बाबासाहेब वाकळे.