नेवासा : वाढदिवसानिमित्त शाळा, वाचनालयांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काढले.
माका (ता. नेवासा) गावचे भूमिपुत्र, माजी पोलीस अधिकारी तथा गावचे सरपंच नाथाजी घुले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुली स्मिता अशोक मोराळे, दीपाली रामदास खेडेकर, जावई अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी एकत्रित एक लाख रुपयांची ६५० पुस्तके भेट दिली. घुले यांनी ही पुस्तके माका येथील न्यू इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरिष्ठ महाविद्यालय यांना भेट देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याकडे या पुस्तकांची भेट प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी गडाख म्हणाले, पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही आजही सामाजिक भावनेतून घुले काम करतात. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांनी दिलेली पुस्तकांची मौल्यवान भेट गावातील शाळेस भेट देण्याचा घुले यांचा उपक्रम प्रेरणादायी आहे.
यावेळी मुळा कारखाना अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, जबाजी फाटके, भाऊसाहेब मोटे, संचालक बाबूराव चौधरी, बाळासाहेब गोरे, संजय जंगले, रंगनाथ जंगले, बाळासाहेब परदेशी, बाळासाहेब पाटील, नारायण लोखंडे, बाबासाहेब भणगे, नीलेश पाटील, सोपान पंडित, लक्ष्मण पांढरे, कारभारी डफळ, बाळासाहेब बनकर, दामोधर टेमक, बबन दरंदले, कडूबाळ गायकवाड, आदी उपस्थित होते. वसंतराव भोर यांनी आभार मानले.
----- १८ सोनई गडाख
सोनई येथे माका येथील विद्यालयास भेट देण्यात येणारी पुस्तके प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याकडे सुपूर्द करताना नाथाजी घुले व इतर उपस्थित होते.