अहमदनगर : शहर व परिसरातील विविध विकासकामांच्या निधीबाबत लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधीची मागणी करणार असल्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी सांगितले.
शिवसेनेच्या जिल्ह्यातील संपर्क अभियानाचा शुभारंभ सोनई येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर रोहिणी शेंडगे, सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्यासह शहर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महापाैर शेंडगे यांचा गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गडाख पुढे म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात विकासकामे हाती घेण्यात येतील. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात. तातडीने प्रस्ताव तयार करून ते नगरविकास खात्याकडे पाठवू. तसेच संयुक्त बैठक घेऊन शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गडाख म्हणाले. संपर्कप्रमुख कोरगावकर यांनी नगर शहरातील रस्ते, वाहतुकीसह अन्य प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगितले. शहरप्रमुख सातपुते यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर गडाख यांनी शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.
...
शहरात शिवसेना राबविणार संपर्क अभियान
शिवसेनेच्या वतीने संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचा शुभारंभ जलसंधारणमंत्री गडाख यांच्या हस्ते करण्यात आला आहे. शहर शिवसेनेच्या वतीने नगर शहरात संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
..
सूचना: फोटो आहे.