शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जमावाकडून चोरट्यांना चोप

By admin | Updated: March 20, 2024 11:04 IST

अहमदनगर : बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात इसमांना जमावाने चांगलाच चोप देवून पोलिसांच्या हवाली केले.

अहमदनगर : एका कामगार ठेकेदाराने कामगारांच्या पगारासाठी बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात इसमांना जमावाने चांगलाच चोप देवून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शनिवारी मार्केटयार्ड परिसरात घडली.एम.आय.डी.सी.तील कामगार ठेकेदार बाबुराव भानुदास बडे यांनी मार्केटयार्ड भागातील मर्चंटस् बँकेतून अडीच लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीकडे दिली. ते दुचाकीवरून पैसे घेऊन जात असताना दोन अज्ञात युवकांनी बडे यांचा पाठलाग केला. बंगाल चौकी, ख्रिस्तगल्लीमार्गे ते कापडबाजारातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेकडे येत असताना दोन अज्ञात युवकांनी बडे यांच्या पत्नीच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र हातात बॅग पक्की धरल्याने ती चोरट्यांच्या हाती लागली नाही. चोरट्यांच्या धसक्याने त्या खाली पडल्या त्या वेळीही चोरट्यांनी बँग पळविण्याचा प्रयत्न केला. कापड बाजारातील या थराराने अनेक जणांना घाम फुटला. यावेळी अडथळे पार करीत बडे आणि चोरटे दुचाकीवरून धावत असताना जमावाने चोरट्यांना पकडून चांगलाच चोप दिला. चोरीची विनाक्रमांकाची मोटारसायकल वापरून त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बडे यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी.एस. जाधव तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)