शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नगरसेवकांना मुख्याधिकारी वैतागले

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

कोपरगाव : शिवाजी कापरे यांनी विनंती करुन कोपरगावमधून बदली करुन घेतली़ त्यानंतर तब्बल चार महिने पालिकेला मुख्याधिकारी नव्हता़ श्याम गोसावी आले

कोपरगाव : शिवाजी कापरे यांनी विनंती करुन कोपरगावमधून बदली करुन घेतली़ त्यानंतर तब्बल चार महिने पालिकेला मुख्याधिकारी नव्हता़ श्याम गोसावी आले, परंतु तेही काही दिवसांतच नगरसेवकांच्या त्रासाला वैतागले़महिला सदस्यांच्या नातलगांकडूनही त्रास सुरू आहे़ ठेकेदार, नगरसेवक, महिला सदस्यांचे नातेवाईक यांच्याकडून मोठा त्रास होत असल्याचे पत्र मुख्याधिकारी गोसावी यांनी विभागीय आयुक्तांना धाडले आहे़ तर या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी गोसावी ६० दिवसांच्या रजेवर गेले आहेत़कोपरगावचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी नाशिक विभागाचे आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांना तीन पानी पत्र लिहिले आहे़ यात म्हटले आहे, की नगरसेवकांनी वृत्तपत्रातून केलेले आरोप निराधार आहेत़ विकासाच्या नावावर ७० ते ७५ हजार रुपयांच्या कामाचे तुकडे करुन त्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे, वार्षिक ठेकेदारामार्फत कार्यादेश देऊन कामे करण्यात आली़ वार्षिक ठेकेदाराच्या नावावर नगर परिषदेतील काही पदाधिकारीच कामे करु लागली आहेत़ २ वर्षामध्ये साडे तीन कोटी रुपयांची बिले काढली़ याशिवाय दीड कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत़ कामे करताना कुठल्याही प्रकारची गुणवत्ता न ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही शहरामध्ये विकासाची कामे झाल्याचे दिसून येत नाहीत़ तेव्हा साठ दिवसांची रजा मंजूर करावी, अशी विनंती गोसावी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आयुक्तांना केली आहे़पालिकेच्या कामात लुडबुडमहिला नगरसेवकांचे नातेवाईक हे काम याला द्या, त्याला द्या, असे सुचवितात़ त्यांच्या सांगण्यावरुन कामे देणे शक्य नाही़ ही मंडळी नगरसेवक नाही़ परंतु पालिकेच्या दैनंदिन कामकाजात लुडबुड करतात़ त्याचा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा त्रास आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना धाडलेल्या पत्रात म्हटले आहे़कोपरगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे़ शासनाच्या विविध योजनांतून साडे तीन कोटीची कामे प्रस्तावित आहेत़ मुख्य रस्ता, पालखी रस्त्याच्या कामाचे तुकडे केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कामास स्थगिती दिली़ कामाचे तुकडे, निविदा पूर्वीच झाली होती़ कामाचे एकत्रिकरण करुन एकच ई-निविदा काढण्यात आली़ निविदा उघडण्याची शिफारस सभागृहाला केली़ प्रमुख रस्त्यांच्या निविदांना स्विकृती न देता थेट कार्यारंभ आदेश देण्यासाठी धमकावले जात असल्याचे मुख्याधिकारी यांनी पत्रात नमूद केले आहे़पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून काम करुन घेताना आतताईपणा करु नये़ चुकीचे किंवा नियमबाह्य काम करुन घेण्यासाठी दबाव आणू नये़ अधिकाऱ्यांनीही समतोल विकास होण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, जेणे करुन नागरिकांना त्यांच्या कररूपी पैशाचा विनियोग झाल्यासारखे वाटेल़ कोपरगावचे दुर्दैव आहे, येथे प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतो़ त्यामुळे चांगले अधिकारी कोपरगावात येण्याचे टाळतात़-डॉ़ अजेय गर्जे,नगरसेवकपूर्वी ७५ हजारांच्या कामाचे तुकडे करता येत होते़ मजूर संस्थांना कामे देता येत होती़ मात्र पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामाचे तुकडे करायचे नाही, मजूर संस्थांना कामे द्यायची नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला़ त्यामुळे नागरिकांची छोटी-छोटी कामे होत नाही़ त्यामुळे मुख्याधिकारी व नगरसेवकांमध्ये वाद होतात़ ते होणारच, याला नगरसेवकच जबाबदार आहेत़ कारण त्यांनीच सभागृहात विषय मंजूर करुन घेतला़-नयनकुमार वाणीसत्ताधारी नगरसेवक