शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ च्या कामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 23:49 IST

अहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़

खर्चाची घेणार माहिती : राज्य लेखा परीक्षण समितीकडून कामांची पाहणीअहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़ जिल्ह्यातील कामांना भेटी देवून कामाची गुणवत्ता, त्यापासून होणारा लाभ आणि त्यावर झालेल्या खर्चाची माहिती घेणार असल्याने संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहे़ राज्य लेखा परीक्षण विभागाची त्रिसदस्यीय समिती नगरमध्ये दाखल झाली आहे़ जिल्हा अधीक्षक कृषी विभागाचे भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या ‘जलयुक्त’च्या कामांची माहिती मंगळवारी समिती सदस्यांना दिली़ कामांची माहिती घेऊन ही समिती जिल्ह्यातील निवडक गावांना भेटी देणार आहे़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची गुणवत्ता व उपयोगिता ही समिती तपासणार आहे़ तसेच गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावात कामे झाली का? झालेल्या कामांमुळे शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे़ शेतकऱ्यांचे याबाबत काय म्हणणे आहे, याची माहिती घेऊन समिती अहवाल तयार करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़ सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या कामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत़ त्याचे समितीकडून निराकारण करण्यात येणार आहे़ मागील वर्षी जिल्ह्यात २७९ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली होती़ निवड झालेल्या गावांत १३ हजार १३८ कामे हाती घेण्यात आली आहेत़ त्यापैकी १२ हजार ८७८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २६० कामे प्रगतिपथावर आहेत़ त्यावर १७३ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले आहेत़ श्रीरामपूर तालुका ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करण्यात आघाडीवर आहे़ सदर तालुक्यातील २५४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ यापैकी निवडक कामांची पाहणी लेखा परीक्षण समितीकडून करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)त्रयस्थ संस्थेकडून कामांची चौकशीजिल्हा नियोजन समितीकडून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची तपासणी करण्यासाठी पुणे येथील गोखले इन्स्टिट्युटची नियुक्ती करण्यात आली आहे़ संस्थेच्या पथकाने जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची तपासणी करून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केले आहेत़ जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडून यासंदर्भात अहवाल मागविला आहे़जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २७९ गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत़ या कामांची तपासणी करण्यासाठी राज्य लेखा परीक्षण समिती दाखल झाली आहे़ समितीकडून काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी करणार आहे़- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक