शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणाचे दोषारोपपत्र आज होणार दाखल

By admin | Updated: May 11, 2017 02:56 IST

नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी गुरूवारी ( दि. ११) जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार असून, यामध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी गुरूवारी ( दि. ११) जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार असून, यामध्ये आरोपींची संख्या वाढणार असल्याचे समजते़ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग हे दोषारोपपत्र दाखल करणार आहे़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या मागणीनुसार २३ एप्रिल रोजी राज्य सरकारने पांगरमल दारूकांड प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला़ सीआयडीचे कोल्हापूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा तपास पूर्ण करण्यात आला़ मागील सहा दिवसांपूर्वी सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दोन दिवस नगरमध्ये येऊन या प्रकरणाचा आढावा घेतला़ या प्रकरणाला १२ मे रोजी ९० दिवस पूर्ण होत असल्याने न्यायालयात गुरूवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़ पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी करत असलेल्या भाग्यश्री मोकाटे व मंगल आव्हाड यांच्यावतीने कार्यकर्ते व मतदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते़ या पार्टीत विषारी दारू पिल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला़ ही दारू येथील जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होत असल्याचे समोर आले़ त्यानंतर विषारी दारूमुळे नेवासा तालुक्यातील १, नगर तालुक्यातील कौडगाव येथील २ तर दरेवाडी येथील दोन अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे़ या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास करून १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ १९ पैकी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे फरार आहे़ तर राजू बुगे याचा अपघातात मृत्यू झाला आहे़