शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पांगरमल घटनेतील २० आरोपींवर २३९६ पानांचे आरोपपत्र दाखल

By admin | Updated: May 11, 2017 17:03 IST

आरोपींची संख्या आता २० वर पोहोचली आहे़ सीआयडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली़

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ ११ - नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी गुरूवारी (दि. ११) जिल्हा न्यायालयात २३९६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले़ यात २० आरोपींचा समावेश आहे़सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून, त्यात सुरजितसिंग भगतसिंग गंभीर हा आरोपी निष्पन्न झाला आहे़ त्यामुळे आरोपींची संख्या आता २० वर पोहोचली आहे़ सीआयडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली़ पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी करत असलेल्या भाग्यश्री मोकाटे व मंगल आव्हाड यांच्यावतीने कार्यकर्ते व मतदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते़ या पार्टीत विषारी दारू पिल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला़ ही दारू येथील जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होत असल्याचे समोर आले़ त्यानंतर विषारी दारूमुळे नेवासा तालुक्यातील १, नगर तालुक्यातील कौडगाव येथील २ तर दरेवाडी येथील दोन अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे़ या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास करून १९ जणांवर गुन्हा दाखल केला होता़ १९ एप्रिलला तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर सुरजितसिंग गंभीर हा आणखी एक आरोपी निष्पन्न झाला़ परंतु तो अद्याप फरार आहे़ २० आरोपींपैकी गंभीर व जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे हे दोघे फरार असून, राजू बुगे या आरोपीचा अपघातात मृत्यू झाला आहे़