शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे

By admin | Updated: March 31, 2017 19:15 IST

लग्नकार्यात मानपान देणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आॅनलाइन लोकमत
 
अकोले (अहमदनगर), दि. ३१ - काळाची गरज ओळखून आदिवासी समाजात ‘सामुदायिक विवाह सोहळा’ रुजविण्याचा निर्धार शेंडी भंडारदरा येथे आदिवासी मित्र मंडळ व पश्चिम पट्टा आदिवासी वारकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच लग्नकार्यात व हळदी समारंभात मानपान देणे घेणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
शेंडी (भंडारदरा) येथील दत्त मंदिरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या आदिवासी मेळाव्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, काशिनाथ  साबळे, मारुती लांघी, बाबूराव अस्वले, प्रा.दिलीप रोंगटे, सुरेश गभाले, देवराम महाराज इदे, तुकाराम महाराज बांडे, लक्ष्मण उघडे, पांडुरंग इदे, विठ्ठल खाडे, आनंद खाडे, आनंद मधे, सीताराम झडे, पुनाजी सगभोर आदी उपस्थित होते. 
लग्नात मानापानाच्या नावाखाली हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. ढांगाढोंगावर मोठा खर्च होतो. या सर्व बाबींवर निर्बंध म्हणून सामुदायिक विवाह सोहळा ही काळची गरज असल्याने आदिवासी मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह चळवळ राबविली जाणार आहे. योग्य त्या कागदपत्रांसह नावनोंदणी करून वधूवरांकडून प्रत्येकी ५०० रुपये, १ पोते तांदूळ घेऊन मंडळामार्फत वधू-वराचे कपडे, हळदी समारंभ, पुरोहित, लाईट मंडप व जेवणाचा खर्च केला जाणार आहे. अमृतेश्वर मंदिर रतनवाडी,भंडारदरा येथील धरणाच्या पायथ्याची बाग, घोरपडा देवी मंदिर रंधा आदी ठिकाणी सामुदाईक विवाह सोहळ्यांचे विभागवार आयोजन करण्याचे यावेळी ठरले. आदिवासी समाजात हे क्रांतिकारक पाऊल उचलले जात असल्याने २ मे रोजी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १०१ विवाह करण्याचा मानस अशोक भांगरे यांनी यावेळी व्यक्त केला.