शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

दहीहंडी उत्सवाला सेलिब्रिटींचे आकर्षण

By admin | Updated: August 17, 2014 23:45 IST

अहमदनगर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी आयोजक मंडळे व गोविंदा पथक सज्ज झाले आहेत़

अहमदनगर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी आयोजक मंडळे व गोविंदा पथक सज्ज झाले आहेत़ सेलिब्रिटींची उपस्थिती आणि गाण्यांच्या तालावर शहरातील विविध चौकांमध्ये सोमवारी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे़ प्रेरणा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवासाठी सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय व दिल्लीगेट येथील दहीहंडीसाठी अभिनेत्री सायली भगत येणार असल्याने दहीहंडीचा आनंद द्विगुणित होणार आहे़ श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे सर्वांनाच मोठे आकर्षण असते़ हा उत्सव आता काही तासांवर येऊन ठेपला असून, आयोजक मंडळे व गोविंदा पथकांनी जय्यत तयारी केली़ चौकाचौकात फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत़ शहरातील माळीवाडा बसस्थानकाशेजारील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सायंकाळी सात वाजता दहीहंडी उत्सवाला प्रारंभ होणार आहे़ विवेक ओबेरॉय याच्या उपस्थितीत येथे १ लाख ११ हजार १११ रुपयांची ही दहीहंडी होणार आहे़ तर दिल्लीगेट येथे हरिहरेश्वर मित्रमंडळ, सिद्धेश्वर, जंगुभाई ट्रस्ट व छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्यावतीने १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक विजेत्यांना देण्यात येणार असून, या ठिकाणी अभिनेत्री सायली भगत उपस्थित राहणार आहे़ चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने दहिहंडी फोडणाऱ्या पथकाला ७७ हजार ७७७ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडे एकूण २५ मंडळांनी परवानगी मागितली आहे़ शहरातील दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, रंगार गल्ली, बुरुड गल्ली, नेता सुभाष चौक, गांधी मैदान, लक्ष्मी कारंजा, प्रोफेसर कॉलनी, सावेडी उपनगर, भिंगार, पाईपलाईन रोड, चितळे रोड आदी भागात विविध मंडळांच्यावतीने दहीहंडी उत्सव रंगणार आहे़ शहरातील प्रमुख मंडळांच्या दहीहंडी फोडण्यासाठी जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कल्याण, भिवंडी येथील गोविंदा पथके सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी)हंडी फोडायचीय़़़? हेल्मेट वापराशहरात विविध मंडळांच्या वतीने किमान ४५ ते ४० ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून दहीहंडीच्या ठिकाणासह शहरातील विविध चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आयोजकांना सूचित केले आहे़ असा आहे बंदोबस्त५ एपीआय व पीएसआय दर्जाचे अधिकारी८० पोलीस कर्मचारी३० होमगार्डएसआरपीची एक प्लाटूनसह ट्रायकिंग फोर्स १२ वर्षाखालील बालगोविंदाला दहीहंडी फोडता येणार नाही़ध्वनीक्षेपण यंत्रणा ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजात लावता येणार नाही़हंडी फोडणाऱ्यांना हेल्मेट व सुरक्षा पट्टा पुरविणे़थर रचण्यात सहभागी असणाऱ्यांचे नाव, फोटो पत्ता व पथकाचे नाव घेणे़डीजेला मनाई दहीहंडी उत्सवात पोलिसांनी डीजे वाजविण्यास मनाई केली आहे़ याबाबत पोलिसांनी साउंड सिस्टिम व्यावसायिक व आयोजक मंडळ अशा ४८ जणांना नोटीस बजावली आहे़