श्रीगोंदा : मराठ्यांच्या इतिहासात अटकेपार झेंडा लावलेले पराक्रमी सेनापती महादजी शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रीगोंदा येथील त्यांच्या स्मारकातील पादुकांची तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक प्रियंका शिंदे, दिलीपराव पोटे यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. स्मारकाविषयीची माहिती प्रा. डॉ. नारायण गवळी व सचिन झगडे यांनी दिली. जिल्हा बँकेच्या संचालकपदी अनुराधा नागवडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सतीशचंद्र सूर्यवंशी, बापू जाधव,रत्नाकर हराळ, रमणिकभाई पटेल, सुधाकर जानराव, ॲड. रंगनाथ बिबे, सुरेखा लकडे, रमेश गांधी, दत्तात्रय जगताप, गोरख नागवडे, सतीश शिंदे, विनायक ससाणे, दत्तात्रय शिंदे, अनिल बोरुडे, ईश्वर कणसे, संदीप माने, दिलीप धाडगे उपस्थित होते.
श्रीगोंद्यात महादजी शिंदे स्मृतीदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST