कोथळे येथील वनपाल शंकर लांडे यांना सोमवारी मिळालेल्या गुप्त बातमीतून सोमलवाडी शिवारामध्ये जंगली डुकराची बंदुकीने शिकार झाल्याची खबर मिळाली. गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल वन्यजीव राजूरचे दत्तात्रय पडवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीची चक्रे फिरवली. यात मौजे गंभीरवाडी (सोमलवाडी) येथील एका संशयित आरोपीच्या घरातून ॲल्युमिनियमच्या पातेल्यात ठेवलेले जंगली डुकराचे मांस जप्त करून त्यास तत्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले. मंगळवारी या आरोपीस न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग अकोले यांच्यासमोर हजर केले. त्यास तीन दिवसांची वन कोठडी मिळाली. चौकशीमध्ये आरोपीच्या घराची झडती घेतली असता ५ डुक्कर मारण्याचे जाळे, ५ वाघुर, २ कोयते, वाघुरला लावण्याच्या काठ्या, १ दारूची बाटली, १ बॅटरी, मटन तोडण्याचा लाकडी ठोकळा असा मुद्देमाल हस्तगत केला.
रानडुकराची शिकार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:20 IST