अहमदनगर : मालवाहतूक रेल्वेचा एक डबा गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास रुळावरून घसरल्यामुळे नगरमार्गे होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली़ रुळावर अडकेलेला हा डब्बा हटविण्यात रेल्वेच्या आपत्कालीन विभागास शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास यश आले़ नगर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या खोकरनाला परिसरात मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा एका डब्याचे चाक गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास रुळावरून घसरले़ मालधक्यावरून माल उतरुन घेतल्यानंतर हा प्रकार घडला़ (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाने तातडीने दौंड येथील आपत्कालीन विभागास याविषयीची माहिती दिली़ आपत्कालीन विभागाचे कर्मचारी के्रनसह दाखल झाले़ पथकातील कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले़ पहाटे सहा वाजेच्या सुमारास रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला़ रुळावरून डबा घसरल्यामुळे या मार्गे येणाऱ्या रेल्वे विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या़ रात्रभर या रेल्वे एकाच जागेवर होत्या़ त्या सकाळी सोडण्यात आल्या़ महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळपर्यंत एकाच जागेवर उभी होती़ गोवा एक्सप्रेसही थांबविण्यात आली होती़ नागपूर-पुणे, पटणा पुणे या गाड्याही अडकल्या होत्या़ येथे थांबल्या गाड्या...विळद, बेलापूर,राहुरी आणि मनमाड या स्टेशनवर रेल्वे थांबविण्यात आल्या होत्या़ मार्ग खुला झाल्यानंतर त्या पुढे मार्गस्थ झाल्या.खोकरनाला येथे मालवाहतूक रेल्वेचा डबा क्रमांक- १४ रुळावरून घसरला होता़ त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली-श्रध्दा पठारे, महिला पोलिस नाईक.
मालवाहतूक रेल्वेचा डबा घसरला
By admin | Updated: June 21, 2014 00:47 IST