लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिकेच्या कै. बाळसाहेब देशपांडे रुग्णालयात गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. तसेच दिव्यांगांना घरी जाऊन लस देण्यासाठी मोबाइल व्हॅन महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, महिला-बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेणाप्पा, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका मंगला लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी जगताप म्हणाले की, लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या ठिकाणी गरोदर महिलांना लस घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना लस देण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरात दिव्यांगांची संख्या मोठी आहे. त्यांनाही केंद्रावर जाणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना घरी जाऊन लस दिली जाणार असून, त्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आली आहे, असे यावेळी जगताप यांनी सांगितले.
.....
सूचना फोटो: १२ संग्राम जगताप नावाने आहे.