महिलेचे दागिने चोरले
अहमदनगर : घरात डब्यात ठेवलेले ३५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. शहरातील बालिकाश्रम रोडवरील नीलक्रांती चौकात १९ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शारदा कुमार पटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक तरटे पुढील तपास करीत आहेत.
दुकान फोडून चोरला किराणा
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील हंगा येथे चोरट्यांनी दुकान फोडून २८ हजार ९०० रुपयांचा किरणा माल चोरून नेला. १९ ते २० डिसेंबरदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात मनीषा संतोष वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक ओहोळ पुढील तपास करीत आहेत.