कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नर्स व इतर स्टाफ पदे भरण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन ऊसतोड मजूर कामगार आघाडी नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. दादासाहेब खेडकर, ग्रामपंचायत सदस्य मिथुन डोंगरे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार मोनिका राजळे यांच्याकडे केली आहे. खरवंडी कासार येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्रे येतात. पूर्व भागातील पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरात ऊसतोड मजूर असल्याने येथील आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारासाठी वणवण फिरावे लागते. रुग्णांना अहमदनगर किंवा बीड जिल्ह्यात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खरवंडी कासार ग्रामीण रुग्णालय उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST