मुलांना लागलयं ‘स्पिनर’चे याडं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:44 IST
सुदाम देशमुख/अहमदनगर : अंगठा आणि मधल्या बोटांच्या मध्ये बेअरिंगच्या सहायाने गरगर फिरणारे ‘स्पिनर’ आता मुलांच्या हातोहाती दिसत आहेत. छोट्या पंख्यासारख्या तीन पात्यांच्या ‘स्पिनर’ने मुलांना चांगलेच वेड लागले आहे. उद्याने-मैदाने सोडून मुलांचे खेळ आता बोटांवर रंगत आहेत. एकाग्रता साधण्याचा दावा करून मुले स्पिनर घेण्यासाठी पालकांकडे हट्ट करीत आहेत. दहा रुपयांपासून ते सात हजार रुपये किमतीच्या या चायनी स्पिनरमुळे दुकानदारांची मात्र चंगळ झाली आहे.
मुलांना लागलयं ‘स्पिनर’चे याडं !
सुदाम देशमुख/अहमदनगर : अंगठा आणि मधल्या बोटांच्या मध्ये बेअरिंगच्या सहायाने गरगर फिरणारे ‘स्पिनर’ आता मुलांच्या हातोहाती दिसत आहेत. छोट्या पंख्यासारख्या तीन पात्यांच्या ‘स्पिनर’ने मुलांना चांगलेच वेड लागले आहे. उद्याने-मैदाने सोडून मुलांचे खेळ आता बोटांवर रंगत आहेत. एकाग्रता साधण्याचा दावा करून मुले स्पिनर घेण्यासाठी पालकांकडे हट्ट करीत आहेत. दहा रुपयांपासून ते सात हजार रुपये किमतीच्या या चायनी स्पिनरमुळे दुकानदारांची मात्र चंगळ झाली आहे.दोन महिन्यांपासून बाजारात स्पिनरने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चिनी बनावटीचे हे स्पिनर मुलांच्या हातचे खेळणे बनले आहे. लहान मुलांपासून ते दहावी-बारावीपर्यंतच्या मुलांचे स्पिनर लाडके बनले आहे. चार मुले एकत्र जमली की एकमेकांच्या खिशातून हळूच स्पिनर बाहेर काढत ते बोटावर फिरू लागते. स्पिनर असलेल्या मुलांभोवती प्लास्टिक किंवा मेटलमधील स्पिनरच्या मध्यभागी बेअरिंग बसविलेली असते. या बेअरिंगवर अंगठा आणि मधले बोट धरून ते गरगर फिरविले जाते. काही स्पिनरवर रेडियम लावल्याने ते अंधारातही चमकते. याच खेळाला फिजिट स्पिनरदेखील म्हटले जाते. स्पिनरने एकाग्रता साधली जाते, असे मुले एकमेकांना सांगत असल्याने या आगळ््या-वेगळ््या खेळणीचा प्रसार झपाट्याने वाढला आहे.अगदी सुदर्शन चक्राप्रमाणेच एकाच बोटावर स्पिनर फिरवण्यासाठी मुलांमध्ये चांगलीच स्पर्धा लागते. या स्पिनरमध्येही नाना प्रकार बाजारात आले आहेत. दहा रुपये, शंभर रपये, तीनशे ते एक हजार आणि त्यापुढे सात हजार रुपयांपर्यंतचे प्लास्टिक आणि मेटलमधील स्पिनर उपलब्ध आहेत. अगदी लहान मुलांसाठी दहा ते शंभर रुपयांपर्यंतचे स्पिनर आहेत, तर मोठी मुले दीडशे रुपयांपासून एक हजारपर्यंतची स्पिनर खरेदीसाठी पालकांकडे हट्ट करीत आहेत. उद्याने, चित्रपटगृह, सोसायटी, गल्ली-बोळात कुठेही खेळणाºया मुलांच्या हाती स्पिनर हे एकमेव खेळणे आता कॉमन घटक झाला आहे. स्पिनर नसेल तर मुलांनाही मित्रांमध्ये कमीपणा वाटू लागल्याने सर्वच मुलांच्या हातात हे खळणे दिसू लागले आहे.--- गतवर्षी बेब्लेटची साथ होती. नाना प्रकारच्या बेब्लेटचा संग्रह करण्याचे मुलांना वेड लागले होते. मॉब मेंटेलिटीप्रमाणे मुले वागतात. दुसºयाकडे आहे ते माझ्याकडे असावे, अशी मुलांची मानसिकता होती. याबाबत पालकांनी नकार दिला तर मुले दोन-तीन दिवसांत हट्ट करणे सोडून देतात. स्पिनरमधून एकाग्रता मिळते, अशी मानसिकता तयार केल्यानेच हे खेळणे जास्त विकले जात आहे. मुले सवयीचे गुलाम होतात. सवय लागू न देणे ही पालकांची जबाबदारी आहे. कोणती गोष्ट मुलांच्या हाती किती वेळ द्यायची, यावर पालकांचे नियंत्रण असले पाहिजे. -डॉ. सूचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञ----------------अगदी बालवाडीतील मुलांपासून ते सातवी-आठवीची मुलेही ‘स्पिनर’ची मागणी करतात. गणेशोत्सवाच्या आधीपासून स्पिनर फॉममध्ये आले आहे. दररोज १०- १२ स्पिनर विकले जात आहेत. छोट्या मुलांसाठी छोटी आणि स्वस्त स्पिनर आहेत. रंगीबेरंगी, लाइट लागणारे आणि ब्ल्यू ट्युथद्वारे कनेक्ट करून गाणी ऐकण्याची संधीही स्पिनरमध्ये उपलब्ध असून, अशा स्पिनर्सना मुलांकडून मागणी आहे.-प्रसन्न एखे, विक्रेता, सावेडी