शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वरुरमधील वादप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: October 29, 2016 00:41 IST

शेवगाव : वरुर येथे २६ आॅक्टोबरला दोन गटात झालेल्या वादप्रकरणी राजू गायकवाड व आसाराम गरुड (दोघे रा. वरुर) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

शेवगाव : वरुर येथे २६ आॅक्टोबरला दोन गटात झालेल्या वादप्रकरणी राजू गायकवाड व आसाराम गरुड (दोघे रा. वरुर) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दिलीप त्रिंबक वावरे व संदीप दिलीप वावरे यांनी बैल मारतो, बाजूला हो, असे म्हटल्याचा राग आल्याने त्यांना गावातील आसाराम बबन गरुड, राजू योसेफ गायकवाड, शरद योसेफ गायकवाड, फावल्या योसेफ गायकवाड, अंबादास बाजीराव राजगुरू व बन्सी गोरडे (सर्व रा. वरुर) यांनी लोखंडी सळया, काठ्या व फायटरने जखमी केले. तसेच गळ्यातील सोनसाखळी, रोख रक्कम असा एकूण ४२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार दिलीप वावरे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिली होती. जखमी दिलीप वावरे यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. होते. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील राजू गायकवाड व आसाराम गरुड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तक्रार देण्यासाठी दिलीप वावरे, बाळू किसन खैरे, विकी बाबासाहेब मोरे हे शेवगाव पोलीस ठाण्यात आले असता तेथे कैलास तिजोरे, कडू मगर व इतर दहा ते पंधरा लोकांनी तुम्ही आमच्या लोकांच्या विरुद्ध तक्रार देता का? असे म्हणून खाली पाडून मारहाण करुन जखमी केल्याच्या तक्रारीवरुन कैलास तिजोरे, कडू मगर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन कैलास तिजोरे व कडू मगर यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली.वरुर येथे अजूनही तणाव कायम असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तेथे दंगल नियंत्रण पथक तसेच धडक कृती दल तैनात केल्याची माहिती शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवधरे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)