अहमदनगर : औरंगाबादहून नगरकडे दुचाकीवरून दोघेजण गावठी कट्टा घेऊन विक्रीसाठी येत असताना एम.आय.डी.सी. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार औरंगाबादहून एका दुचाकीवर दोघेजण गावठी कट्टा घेऊन विक्रीसाठी येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार बकाले यांनी खासगी वाहनातून औरंगाबाद रोडवरील टोलनाक्यावर सापळा रचला. दिलेल्या माहितीतील वर्णनाची दुचाकी त्यांना टोलनाक्यावर आढळून आली असता त्यांना पकडून चौकशी केली असता त्यांच्या पाठीवरील बॅगमध्ये मॅगझिनसह एक गावठी कट्टा मिळून आला. तसेच दोन जीवंत काडतुसेही सापडली. अजित रामचंद्र गायकवाड (वय २२), दुर्गादास पांडुरंग शेंडगे (वय २५, दोघे रा. कासार साई, मुळशी, जि. पुणे) यांना पोलिसांनी अटक केली. किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकातील सात-आठ कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. हे गावठी कट्टे कोठून आणले, कोणत्या कारणासाठी विकले जात होते, याचा बकाले तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)लूट प्रकरणातील चौघे जेरबंददोन दिवसांपूर्वी बकाले यांच्या पथकाने इमामपूर घाटात १८ जुलै रोजी ट्रकचालकाला लुटल्याच्या प्रकरणातील चार आरोपींनाही जेरबंद केले आहे. ट्रकचालक अक्रम अब्दुल खान (वय २७) याला चार अज्ञात इसमांनी इमामपूर घाटात लुटले होते. त्याच्याकडील ३ हजार रुपये रोख, चांदीचे ब्रॅसलेट, मोबाईल असे सहा हजार रुपये किमतीचे साहित्य हिसकावून घेतले होते. तसेच इसमांनी खान यांना स्वत:च्या गाडीत बसवून दोन किलोमीटर लांब नेऊन सोडले. या प्रकरणी पोलिसांनी विखू मारुती वाघ, आदिनाथ बळीराम तोडमल, संतोष रोहिदास सप्रे, आदिनाथ छगन थोरात (सर्व रा. पिंपळगाव व जेऊर) ़यांना अटक केली असून त्यांनी लूट केल्याची कबुली दिली आहे.
गावठी कट्ट्यासह दोघांना अटक
By admin | Updated: July 21, 2014 00:29 IST