शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळण्यासाठी स्वत:ला घेतले पेटवून

By admin | Updated: May 11, 2017 16:43 IST

पत्राचे घर हटवू नये, या मागणीसाठी एका व्यक्तीने चक्क स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली़

आॅनलाइन लोकमतकोल्हार (अहमदनगर) दि़ ११ - अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात सुरु असलेली कारवाई स्थगित करावी व पत्राचे घर हटवू नये, या मागणीसाठी एका व्यक्तीने चक्क स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली़ या घटनेत संबंधित व्यक्ती ७० टक्के भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़गळनिंब येथे गुरुवारी पोलीस बंदोबस्तात रस्त्याकडेचे अतिक्रमण हटविण्यात येते़ याच मार्गावर अनिल अंबादास कुलकर्णी (वय ६९) यांचे पत्र्याचे घर होते़ हे घर अतिक्रमणात येत होते़ त्यामुळे प्रशासनाने हे घरही हटविण्याची तयारी सुरु केली़ मात्र, कुलकर्णी यांनी ही कारवाई थांबविण्याची मागणी करीत स्वत:च्या घरात जाऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले़ लोकांनी तातडीने कुलकर्णी यांना विझविले़ मात्र, तोपर्यंत आगीने ते प्रचंड भाजले होते़ त्यांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ रुग्णालय अधिकाऱ्यांनी कुलकर्णी हे ७० टक्के भाजले असल्याचे सांगितले़