शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सोनेवाडी शिवारात तरुणाचा खून

By admin | Updated: May 5, 2015 14:53 IST

तालुक्यातील सोनेवाडी परिसरात एका ३0 ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा खून करण्यात आला आहे.

 अहमदनगर : तालुक्यातील सोनेवाडी परिसरात एका ३0 ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा खून करण्यात आला आहे. खून झाल्यानंतर तरुणाची ओळख पटणार नाही, यासाठी मृतदेहाच्या चेहर्‍यावर रासायनिक पदार्थ टाकून चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. अशा अवस्थेतील मृतदेह ग्रामस्थांना आढळून आल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी अज्ञात तरुण आणि अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत अनोळखी मृतदेहाचा तपास लागला नव्हता.सोनेवाडी शिवारात रानवारा सहल केंद्राच्याजवळील (केडगाव ते अकोळनेर जाणार्‍या रस्त्यालगत) एका शेतात रविवारी रात्री ९ वाजता काही ग्रामस्थांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेच नगर तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. मयताचा चेहरा जळालेल्या अवस्थेत होता. सोनेवाडी येथील उपसरपंच गोरख दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. संबंधित इसमाचा खून करून व त्याची ओळख पटू नये, यासाठी चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला असावा. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

तरुणाचा खून करून मृतदेह शिवारात टाकला असावा. मृतदेहाच्या चेहर्‍यावर दाहक पदार्थ टाकून चेहरा विद्रुप करून पुरावा नष्ट करण्याचा आरोपीने प्रयत्न केला आहे. मयत इसमाचा पत्ता, अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. या मयताबाबत कोणाला माहिती असल्यास नगर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.- विनोद चव्हाण,सहा. पोलीस निरीक्षक मयताचे वर्णनमयत हा ३५ ते ४0 वर्षे वयाचा आहे. राखाडी रंगाचा लाल पट्टा असलेला शर्ट, पांढर्‍या रंगाचे बनियन, पायात बदामी रंगाची चप्पल, शरीराने मध्यम, रंगाने काळासावळा, चेहरा गोल, उंची १७0 सेमी असे मयताचे वर्णन आहे. डोक्याच्या डाव्या बाजुला हत्याराने घाव घातल्याने जबर जखमी होवून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर चेहर्‍यावर दाहक पदार्थ टाकण्यात आला आहे.(प्रतिनिधी)